भारतीय दंड संहिता १८६०
कलम १५२ :
लोकसेवक जेव्हा दंगा वगैरे शमवीत असताना त्याच्यावर हमला करणे किंवा त्याला अटकाव करणे (हरकत घेणे) :
(See section 195 of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : लोकसेवक दंगा इत्यादी शमवीत असताना त्याच्यावर हमला करणे किंवा त्याला अटकाव करणे.
शिक्षा :३ वर्षाचा कारावास, किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र :संज्ञेय
जामीनपात्र / अजामीनपात्र :जमानतीय
शमनीय / अशमनीय : अशमनीय.
कोणत्या नायालयात विचारणीय :प्रथम वर्ग मजिस्ट्रेट
———-
एखादा लोकसेवक बेकायदेशीर जमाव पांगण्याचा अथवा दंगा किंवा दंगल शमविण्याचा प्रयत्न करुन असा लोक सेवक म्हणून आपले कर्तव्य पार पाडताना, जो कोणी त्यांच्यावर हमला (अंगावर धावणे) करील किंवा तशी धमकी देईल अथवा अटकाव करील, किंवा अटकाव करण्याचा प्रयत्न करील, अथवा अशा लोकसेवकांवर फौजदारीपात्र बलप्रयोग करील किंवा करण्याची धमकी देईल, किंवा तसा प्रयत्न करील त्याला, तीन वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा किंवा द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील.