भारतीय दंड संहिता १८६०
कलम १३६ :
पलायिताला (पळून आलेल्यास) आसरा देणे :
(See section 164 of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : पळून आलेल्यास आसरा देणे
शिक्षा :२ वर्षाचा कारावास, किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय.
कोणत्या नायालयात विचारणीय :कोणताही दंडाधिकारी
————-
१.(भारत सरकारच्या) भूसेनेतील, २.(नौसेनेतील किंवा वायुसेनेतील) एखादा अधिकारी, भूसैनिक, २.(नौसैनिक किंवा वायुसैनिक) पळून आलेला आहे हे माहीत असताना किंवा तसे समजण्यास कारण असताना, यात यापुढे नमूद केलेले अपवाद वगळता एरव्ही जो कोणी अशा अधिकाऱ्यांना, भूसैनिकाला, २.(नौसैनिकाला अगर वायुसैनिकाला) आसरा देईल त्याला दोन वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा, किंवा द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील.
अपवाद :
पत्नीने तिच्या पतीला आसरा दिलेला असेल त्या प्रकरणाला हा उपबंध लागू होत नाही.
———
१. अनुकूलन आदेश १९५० द्वारा क्वीन याऐवजी दाखल करण्यात आले.
२. १९२७ चा अधिनियम १० – कलम २ व अनुसूची १ यांद्वारे मूळ मजकुराऐवजी दाखल केले.