Ipc कलम १३५ : भूसैनिकाला, नौसैनिकाला किंवा वायुसैनिकाला चाकरी सोडून पळून जाण्यास अपप्रेरणा (चिथावणी) देणे :

भारतीय दंड संहिता १८६०
कलम १३५ :
भूसैनिकाला, नौसैनिकाला किंवा वायुसैनिकाला चाकरी सोडून पळून जाण्यास अपप्रेरणा (चिथावणी) देणे :
(See section 163 of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : अधिकाऱ्याला, भूसैनिकाला, नौसैनिकाला किंवा वायुसैनिकाला चाकरी सोडून पळून जाण्यास अपप्रेरणा देणे.
शिक्षा :२ वर्षाचा कारावास, किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय.
कोणत्या नायालयात विचारणीय :कोणताही दंडाधिकारी
———–
जो कोणी १.(भारत सरकारच्या) भूसेनेतील, २.(नौसेनेतील किंवा वायुसेनेतील) कोणत्याही अधिकाऱ्याला, भूसैनिकाला, २.(नौसैनिकाला, किंवा वायुसैनिकाला) चाकरी सोडून पळून जाण्यास अपप्रेरणा (चिथावणी) देईल त्याला, दोन वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची, शिक्षा किंवा द्रव्यदंडाची, किंवा दोन्ही शिक्षा होतील.
———
१. अनुकूलन आदेश १९५० द्वारा क्वीन याऐवजी दाखल करण्यात आले.
२. १९२७ चा अधिनियम १० – कलम २ व अनुसूची १ यांद्वारे मूळ मजकुराऐवजी दाखल केले.

Leave a Reply