भारतीय दंड संहिता १८६०
कलम १२५ :
भारत सरकारशी सलोख्याचे संबंध असलेल्या कोणत्याही आशियाई सत्तेविरूध्द युध्द करणे :
(See section 153 of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : भारत सरकारशी सलोख्याचे किंवा शांततेचे संबंध असलेल्या कोणत्याही आशियाई सत्तेविरुद्ध युद्ध पुकारणे किंवा असे युद्ध करण्यास अपप्रेरणा देणे.
शिक्षा :आजीवन कारावास व द्रव्यदंड, किंवा ७ वर्षांचा करावास व द्रव्यदंड किंवा द्रव्यदंड
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र :अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय.
कोणत्या नायालयात विचारणीय :सत्र न्यायालय
————-
जो कोणी १.(भारत सरकारशी) सलोख्याचे किंवा शांततेचे संबंध असलेल्या कोणत्याही आशियायी सत्तेच्या शासनाविरूध्द युध्द करील, किंवा असे युद्ध करण्याचा प्रयत्न करील, किंवा असे युद्ध करण्यास अपप्रेरणा (चिथावणी) देईल त्याला, २.(आजन्म कारावासाची) शिक्षा होईल व तिच्या जोडीला त्याच्यावर द्रव्यदंड लादता येईल, किंवा सात वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल व तिच्या जोडीला त्याच्यावर द्रव्यदंड लादता येईल, किंवा द्रव्यदंडाची शिक्षा होईल.
———–
१. अनुकूलन आदेश १९५० द्वारे क्वीन याऐवजी समाविष्ट करण्यात आले.
२. १९५५ चा अधिनियम २६ – कलम ११७ व अनुसूची यांद्वारे जन्मठेप काळे पाणी याऐवजी दाखल करण्यात आले.
इंडियन लॉज मराठी
या अॅप मध्ये भारतीय न्याय संहिता २०२३, भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ व भारतीय साक्ष अधिनियम २०२३ या सहित एकूण ८१ प्लस कायदे मराठी व इंग्रजी भाषेत आहेत. खालील लिंक वरुन अॅप डाऊनलोड करा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.ajinkyainnovations.indianlawsmarathi&hl=en