Ipc कलम १२२ : भारत सरकारविरुद्ध युध्द करण्याच्या उद्देशाने शस्त्रे, इत्यादी गोळा करणे :

भारतीय दंड संहिता १८६०
कलम १२२ :
भारत सरकारविरुद्ध युध्द करण्याच्या उद्देशाने शस्त्रे, इत्यादी गोळा करणे :
(See section 149 of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : भारतात सरकारविरुद्ध युद्ध करण्याच्या उद्देशाने शस्त्रे इ. गोळा करणे.
शिक्षा :आजीवन कारावास किंवा १० वर्षांचा करावास व द्रव्यदंड.
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र :अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय.
कोणत्या नायालयात विचारणीय :सत्र न्यायालय
—————-
जो कोणी १.(भारत सरकार) विरूध्द युध्द करण्याच्या किंवा युध्द करण्यासाठी पूर्वतयारी करण्याच्या उद्देशाने माणसे, शस्त्रे किंवा दारूगोळा गोळा करील अथवा अन्यथा युध्दाची पूर्वतयारी करील त्याला २.(आजन्म कारावासाची) किंवा जास्तीत जास्त दहा वर्षे इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल ३.(आणि तो द्रव्यदंडासही पात्र होईल).
———
१. अनुकूलन आदेश १९५० द्वारे क्वीन याऐवजी समाविष्ट करण्यात आले.
२. १९५५ चा अधिनियम २६ – कलम ११७ आणि अनुसूची यांद्वारे जन्मठेप काळे पाणी याऐवजी समाविष्ट करण्यात आले.
३. १९२१ चा अधिनियम १६ – कलम ३ द्वारे घातले.

Leave a Reply