भारतीय दंड संहिता १८६०
कलम १२० – ब :
१.(फौजदारीपात्र (आपराधिक षडयंत्र) कटाबद्दल शिक्षा :
(See section 61(2) of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : मृत्यूच्या किंवा आजन्म कारावासाच्या किंवा दोन वर्षे अगर त्याहून अधिक मुदतीच्या सश्रम कारावासाच्या शिक्षेस पात्र असलेला अपराध करण्याचा फौजदारीपा कट
शिक्षा :कटाला उद्दिष्टभूत असलेल्या अपराधाच्या अपप्रेरणेसाठी असेल त्यानुसार
दखलपात्र / अदखलपात्र :कटाला उद्दिष्टभूत असलेला अपराध दखलपात्र किंवा अदखलपात्र असेल त्यानुसार.
जामीनपात्र / अजामीनपात्र :कटाला उद्दिष्टभूत असलेला अपराध जामीनपात्र किंवा अजामीनपात्र असेल त्यानुसार.
शमनीय / अशमनीय : अशमनीय.
कोणत्या नायालयात विचारणीय :कटाला उद्दिष्टभूत असलेल्या अपराधाच्या अपप्रेरणाचे कृत्य ज्या न्यायालयात विचारणीय असेल ते न्यायालय.
————
अपराध : अन्य कोणताही फौजदारी पात्र कट
शिक्षा :६ महिन्यांचा कारावास, किंवा द्रव्यदंड, किंवा दोन्ही
दखलपात्र / अदखलपात्र :अदखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय.
कोणत्या नायालयात विचारणीय :प्रथम वर्ग दंडाधिकारी
———–
१)जो कोणी मृत्यूच्या, २.(आजीवन कारावासाच्या) अथवा दोन वर्षे किंवा अधिक मुदतीच्या सश्रम कारावासाच्या शिक्षेस पात्र असा अपराध करण्याच्या फौजदारीपात्र कटातील पक्ष – सभासद असेल त्याला, अशा कटाबद्दलच्या या संहितेत शिक्षेची स्पष्ट तरतुद नसेल तेव्हा, त्याने जणू काही अशा अपराधास अपप्रेरणा (चिथावणी) दिलेली असावी त्याप्रमाणे शिक्षा होईल.
२)जो कोणी वरील प्रकारचा शिक्षापात्र असलेला अपराध वगळता इतर अपराध करण्याच्या फौजदारीपात्र (आपराधिक षडयंत्र) कटातील पक्ष- सभासद असेल त्याला जास्तीत जास्त सहा महिने इतक्या मुदतीच्या कोणत्या तरी एका वर्णनाची कारावासाची, किंवा द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील.)
———–
१. १९१३ चा अधिनियम ८ – कलम ३ द्वारे समाविष्ट करण्यात आले.
२. १९५५ चा अधिनियम १६ – कलम ११७ व अनुसूची यांद्वारे जन्मठेप काळे पाणी याऐवजी दाखल केले.