भारतीय दंड संहिता १८६०
कलम १०६ :
निर्दोष व्यक्तीला अपाय होण्याचा धोका असेल तेव्हा, प्राणघातक हमल्यापासून खाजगीरीत्या बचाव करण्याचा हक्क :
(See section 44 of BNS 2023)
ज्यामुळे मृत्यूची वाजवी धास्ती निर्माण होते अशा हमल्यापासून खाजगीरीत्या बचाव करण्याचा हक्क वापरत असताना जर बचाव करू पाहणारी व्यक्ती निर्दोष (निरपराध) व्यक्तीला अपाय होण्याचा धोका पत्करल्याशिवाय तो हक्क परिणामकारकपणे वापरू शकत नाही, अशा परिस्थितीत सापडली तर, खाजगीरीत्या बचाव करण्याचा तिचा हक्क तो धोका पत्करण्याइतपत व्यापक असतो.
उदाहरण :
(क) वर एक जमाव हल्ला करतो व त्याचा खून करण्याचा प्रयत्न करतो. जमावावर गोळीबार केल्याशिवाय तो खाजगीरित्या बचाव करण्याचा आपला हक्क परिणामकपणे वापरु शकत नाही व जमावात मिसळलेल्या लहान मुलांना अपाय होण्याचा धोका पत्करल्याशिवाय तो गोळीबार करु शकत नाही. याप्रमाणे गोळीबार केल्याने त्याच्याकडून त्यांपैकी कोणाही मुलाला अपाय झाला तर, (क) ने अपराध केला असे होत नाही.