Hsa act 1956 Section 23 : [Special provision respecting dwelling-houses] :

Hindu Succession Act 1956
Section 23 :
[Special provision respecting dwelling-houses] :
Omitted by the Hindu Succession (Amendment) Act, 2005 (39 of 2005), s. 4 (w.e.f. 9-9-2005).
हिन्दू उत्तराधिकार अधिनियम १९५६
धारा २३ :
(निवास-गृह के बारे में विशेष उपबन्ध :
(हिन्दू उत्तराधिकार (संशोधन ) अधिनियम २००५ (२००५ का अधिनियम सं० ३९) की धारा ४ द्वारा (९-९-२००५ से) लोप किया गया।
हिंदू उत्तराधिकार अधिनियम १९५६
कलम २३ :
राहत्या घरासंबंधी विशेष उपबंध :
हिंदू उत्तराधिकार (संशोधन) अधिनियम २००५ (२००५ चा ३९) कलम ४ द्वारे (९-९-२०००५ पासून) निरसित केले.
——–
या पूर्वी कलम खालील प्रमाणे हाते.
जेथे एखाद्या अकृतमृत्युपत्र हिंदूच्या मागे अनुसूचीच्या १ ल्या वर्गामध्ये विनिर्दिष्ट केलेले पुरुष व स्त्रिया असे द्विविध वारस हयात असतील व त्याच्या किंवा तिच्या संपत्तीत संपूर्णपणे त्याच्या किंवा तिच्या कुटुंबातील घटकव्यक्तींचे वास्तव्य असणाऱ्या राहत्या घराचा समावेश असेल तेथे, या अधिनियमात काहीही अंतर्भूत असले तरी, अशा कोणत्याही स्त्री-वारसदाराचा राहत्या घराच्या वाटणीची मागणी करण्याचा अधिकार पुरुष वारसदार त्यातील आपापले हिस्से विभागण्याचे ठरवीपर्यंत उद्भवणार नाही, पण स्त्री-वारसदाराला तेथे राहण्याचा अधिकार असेल :
परंतु, अशी स्त्री-वारसदार कन्या असेल त्याबाबतीत, जर ती अविवाहित असेल किंवा तिच्या पतीने तिला टाकले असेल किंवा ती त्याच्यापासून विभक्त झाली असेल किंवा विधवा असेल तरच तिला त्या राहत्या घरात राहण्याचा अधिकार प्राप्त होईल.

Section 24 :
[Certain widows re-marrying may not inherit as widows] :
Omitted by the Hindu Succession (Amendment) Act, 2005 (39 of 2005), s. 5, (w.e.f. 9-9- 2005).

धारा २४ :
(पिुनर्विवाह करने वाली कुछ विधवाएं विधवा होने के नाते विरासत प्राप्त न कर सकेंगी):
हिन्दू उत्तराधिकार (संशोधन) अधिनियम, २००५ (२००५ का अधिनियम सं० ३९ ) की धारा ५ द्वारा (९-९-२००५ से) लोप किया गया।

कलम २४ :
पुनर्विवाह करणाऱ्या विवक्षित विधवा या विधवा म्हणून वारसदार होणार नाहीत :
हिंदू उत्तराधिकार (संशोधन) अधिनियम २००५ (२००५ चा ३९) कलम ५ द्वारे (९-९-२०००५ पासून) निरसित केले.
——-
या पूर्वी कलम खालील प्रमाणे हाते.
अकृतमृत्युपत्र व्यक्तीशी जी व्यक्ती पूर्वमृत पुत्राची विधवा, पूर्वमृत पुत्राच्या पूर्वमृत पुत्राची विधवा किंवा भावाची विधवा म्हणून संबंधित आहे अशी कोणतीही वारसदार स्त्री, जर उत्तराधिकार खुला होतो त्या दिनांकास ती पुनर्विवाहित असेल तर, अशी विधवा म्हणून ती अकृतमृत्युपत्र व्यक्तीच्या संपत्तीची उत्तराधिकारी होण्यास हक्कदार असणार नाही.

Leave a Reply