Hsa act 1956 कलम ५ : विवक्षित संपत्तींना अधिनियम लागू नसणे :

हिंदू उत्तराधिकार अधिनियम १९५६
प्रकरण २ :
अमृत्युपत्रीय उत्तराधिकार :
सर्वसाधारण :
कलम ५ :
विवक्षित संपत्तींना अधिनियम लागू नसणे :
हा अधिनियम पुढील प्रकारच्या संपत्तीला लागू होणार नाही : –
(एक) ज्या संपत्तीचा उत्तराधिकार विशेष विवाह अधिनियम १९५४ (१९५४ चा ४३) कलम २१ मध्ये अंतर्भूत असलेल्या उपबंधामुळे भारतीय उत्तराधिकार अधिनियम, १९२५ (१९२५ चा ३९) याद्वारे विनियमित होतो अशी कोणतीही संपत्ती;
(दोन) कोणत्याही भारतीय संस्थानाच्या अधिपतीने भारत सरकारशी केलेल्या कोणत्याही प्रसंविदेच्या किंवा कराराच्या अटींअन्वये अथवा या अधिनियमाच्या प्रारंभापूर्वी पारित केलेल्या कोणत्याही अधिनियमितीच्या तरतुदींनुसार, जी संपदा एका वारसदाराकडे जाते अशी कोणतीही संपदा;
(तीन) कोचीनच्या महाराजाने प्रख्यापित केलेल्या, दिनांक २९ जून १९४९ च्या उद्घोषणेद्वारे (११२४ ची ९) प्रदान केलेल्या शक्तींमुळे पॅलेस प्रशासन मंडळाने प्रशासिलेला पॅलेस निधी व वळिअम्म थम्पूरन कोविलकम संपदा.

Leave a Reply