Hsa act 1956 कलम ४ : अधिनियमाचा अधिभावी परिणाम :

हिंदू उत्तराधिकार अधिनियम १९५६
कलम ४ :
अधिनियमाचा अधिभावी परिणाम :
१) या अधिनियमात व्यक्तपणे उपबंधित केले असेल ते खेरीजकरुन एरव्ही –
(a)क) हिंदू कायद्याचे कोणतेही वचन, नियम किंवा निर्वचन अथवा या अधिनियमाच्या प्रारंभाच्या निकटपूर्वी त्या कायद्याचा भाग म्हणून अंमलात असलेली कोणतीही रुढी किंवा परिपाठ या अधिनियमात जिच्याकरता उपबंध केलेला आहे अशा कोणत्याही बाबींच्या संबंधात परिणामक असण्याचे समाप्त होईल;
(b)ख) या अधिनियमाच्या प्रारंभाच्या निकटपूर्वी अंमलात असलेला अन्य कोणताही कायदा या, अधिनियमात अंतर्भूत असलेल्यांपैकी कोणत्याही उपबंधाशी तो जेथवर विसंगत असेल तेथवर हिंदूंना लागू असण्याचे समाप्त होईल.
१.(***)
————
१. २००५ चा अधिनियम क्रं. ३९ च्या कलम २ द्वारा उपधारा (२) गाळले गेले.
यापूर्वी :
२) शंकानिरसनार्थ याद्वारे असे घोषित करण्यात येत आहे की, या अधिनियमात अंतर्भूत असलेल्या कोणत्याही गोष्टींमुळे, कृषि धारणजमिनीच्या तुकडेबंदीसाठी किंवा कमाल मर्यादांच्या निश्चितीसाठी अथवा अशा धारणजमिनीसंबंधी कुळवहिवाट अधिकारांच्या प्रक्रांतीसाठी उपबंध करणाऱ्या त्या त्या काळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्याच्या उपबंधांवर परिणाम होतो असे मानले जाणार नाही.

Leave a Reply