Hsa act 1956 कलम ३० : मृत्युपत्रीय उत्तराधिकार :

हिंदू उत्तराधिकार अधिनियम १९५६
प्रकरण ३ :
मृत्युपत्रीय उत्तराधिकार :
कलम ३० :
मृत्युपत्रीय उत्तराधिकार :
१.(***) कोणत्याही हिदूंला, ४.(त्याने किंवा तिने) मृत्युपत्राद्वारे किंवा अन्य मृत्युपत्रीय व्यवस्थेद्वारे विल्हेवाट करण्याजोगी असेल अशा कोणत्याही संपत्तीची भारतीय उत्तराधिकार अधिनियम १९२५ (१९२५ चा ३९) याचे उपबंध किंवा त्या त्या काळी अंमलात असलेला व हिंदूंना लागू असलेला अन्य कोणत्याही कायदा यांनुसार तशी विल्हेवाट करता येईल.
स्पष्टीकरण :
हिंदू पुरुषाचा मिताक्षार सहदायकी संपत्तीतीतल हितसंबंध अथवा तरवड, तवज्जे, इळ्ळम, कुटुंब किंवा कवर यांतील घटकव्यक्तींचा तरवड, इळ्ळम, कुटुंब किंवा कवर यांच्या संपत्तीतील हितसंबंध, या अधिनियमात किंवा त्या त्या काळी अंमलात असलेल्या अन्य कायद्यात काहीही अंतर्भूत असले तरी, या २.(कलमाच्या) अर्थानुसार त्याने किंवा तिने विल्हेवाट करण्याजोगी संपत्ती असल्याचे मानले जाईल.
३.(***)
———-
१. १९६० चा अधिनियम ५८, कलम ३ व अनुसूची दुसरी यांद्वारे (१) हा आकडा गाळला.
२. १९७४ चा अधिनियम ५६, कलम ३ आणि अनुसूची दुसरी यांद्वारे मूळ मजकुराऐवजी घातले.
३. १९५६ चा अधिनियम ७८, कलम २९ द्वारे पोटकलम (२) गाळले.
४. २००५ चा अधिनियम ३९ कलम ६ द्वारे (९-९-२०००५ पाूसन) त्याने ऐवजी घातले.

Leave a Reply