हिंदू उत्तराधिकार अधिनियम १९५६
कलम २० :
गर्भस्थ अपत्याचे अधिकार :
अकृतमृत्युपत्र व्यक्तीच्या मृत्युसमयी जे अपत्य गर्भात होते व जे नंतर जिवंत जन्मले त्याला किंवा तिला ते जणू काही अकृतमृत्युपत्र व्यक्तीच्या मृत्युपूर्व जन्मले होते अशाच प्रकारे अकृतमृत्युपत्र व्यक्तीचा वारसदार होण्याचा अधिकार असेल व अशा प्रकारची वारसाहक्क अकृतमृत्युपत्र व्यक्तीच्या मृत्युच्या दिनांकी व तेव्हापासून निहित होतो असे मानले जाईल.