Hsa act 1956 कलम १ : संक्षिप्त नाव व विस्तार :

हिंदू उत्तराधिकार अधिनियम १९५६
१.(१९५६ चा अधिनियम क्रमांक ३०)
(१७ जून १९५६)
हिंदूमधील अमृत्युप्रत्रीय उत्तराधिकारासंबंधीचा कायदा विशोेधित व संहिताबद्ध करण्यासाठी अधिनियम भारतीय गणराज्याच्या सातव्या वर्षी संसदेकडून पुढीलप्रमाणे अधिनियमित होवो :-
प्रकरण १ :
प्रारंभिक :
कलम १ :
संक्षिप्त नाव व विस्तार :
१) या अधिनियमास हिंदू उत्तराधिकार अधिनियम १९५६ असे म्हणता येईल.
२) त्याच्या विस्तार २.(***) संपूर्ण भारतभर आहे.
———
१. १९५८ चा केरळ अधिनियम २५ याद्वारे हा अधिनियम केरळमध्ये विशोधित करण्यात आला आहे.
२. जम्मू व काश्मीर राज्य खेरीजकरुन शब्द २०१९ चा ३४ कलम ९५ व पाचव्या अनुसची नुसार गाळले.

Leave a Reply