Hsa act 1956 कलम १७ : मरुमक्कतायम व आळियसंतान कायद्यांनी नियंत्रित होणाऱ्या व्यक्ती संबंधी विशेष उपबंध :

हिंदू उत्तराधिकार अधिनियम १९५६
कलम १७ :
मरुमक्कतायम व आळियसंतान कायद्यांनी नियंत्रित होणाऱ्या व्यक्ती संबंधी विशेष उपबंध :
हा अधिनियम पारित झाला नसता तर, ज्या व्यक्ती मरुमक्कत्तायम किंवा आळियसंतान कायद्याने नियंत्रित झाल्या असत्या त्यांच्या संबंधात कलमे ८, १०, १५ व २३ चे उपबंध अशा प्रकारे परिणामक होतील की, जणू काही, –
एक) कलम ८ च्या उपखंड (ग) व (घ) च्या ऐवजी पुढील मजकूर म्हणजे, –
(c)ग) तिसऱ्यांदा, जर त्या दोहोंपैकी कोणत्याही वर्गातील कोणताही वारसदार नसेल तर त्याच्या नातलगाकडे – मग ते गोत्रज असोत वा भिन्नगोत्रज असोत.
घातला होता;
दोन) कलम १५ च्या पोटकलम (१) च्या (क) ते (ङ) या खंडाच्या ऐवजी पुढील मजकूर म्हणजे :-
(a)क) पहिल्यांदा, पुत्र व कन्या (कोणताही पूर्वमृत पुत्र किंवा कन्या यांची अपत्ये धरुन) आणि माता यांच्याकडे;
(b)ख) दुसऱ्यांदा, पिता आणि पती यांच्याकडे;
(c)ग) तिसऱ्यांदा, मातेच्या वारसदारांकडे;
(d)घ) चवथ्यांदा, पित्याच्या वारसदारांकडे ; आणि
(e)ङ) शेवटी, पतीच्या वारसदारांकडे
घातला होता;
तीन) कलम १५ च्या पोटकलम (२) चा खंड (क) गाळला होता;
चार) कलम २३ गाळले होते.

Leave a Reply