हिंदू विवाह अधिनियम १९५५
कलम २१ग :
१.(कागदोपत्री पुरावा :
कोणत्यांही अधिनियमितीमध्ये विरुद्ध काहीही अंतर्भूत असले तरीसुद्धा, या अधिनियमाखालील विनंतीअर्जाची संपरीक्षा चालू असताना कोणत्याही कार्यवाहीमध्ये कोणताही दस्तऐवज हा, केवळ तो योग्य रीतीने मुद्रांकित केलेला वा नोंदलेला नाही या कारणास्तव पुराव्यात अग्राह्य ठरणार नाही.)
——-
१. १९७६ चा अधिनियम ६८ कलम १४ द्वारे घातले.
