Hma 1955 कलम ४ : अधिनियमाचा अधिभावी परिणाम :

हिंदू विवाह अधिनियम १९५५
कलम ४ :
अधिनियमाचा अधिभावी परिणाम :
या अधिनियमात व्यक्तपणे उपबंधित केले असेल तेवढे खेरीजकरुन एरव्ही,-
(a)क) हिदूं कायद्याचे कोणतेही वचन, नियम किंवा निर्वचन अथवा या अधिनियमाच्या प्रारंभाच्या निकटपूर्वी त्या कायद्याचा भाग म्हणून अंमलात असलेली कोणतीही रुढी किंवां परिपाठ या अधिनियमात जिच्याकरिता उपबंध केलेला आहे अशा कोणत्याही बाबीच्या संबंधात परिणामक असण्याचे समाप्त होईल,
(b)ख) या अधिनियमाच्या प्रारंभाच्या निकटपूर्वी अंमलात असलेला अन्य कोणताही कायदा या अधिनियमात अंतर्भूत असलेल्यांपैकी कोणत्याही उपबंधांशी, तो जेथवर विसंगत असेल तेथवर परिणामक असण्याचे समाप्त होईल.

Leave a Reply