हिंदू विवाह अधिनियम १९५५
कलम २४ :
दावा प्रलंबित असताना निर्वाह खर्च व कार्यवाहीचा खर्च :
या अधिनियमाखालील कोणत्याही कार्यवाहीत, प्रकरणपरत्वे, पत्नी किंवा पती यांपैकी कोणालाही तिचे किंवा त्याचे पोषण व कार्यवाहीचा आवश्यक खर्च यासाठी पुरेसे स्वतंत्र उत्पन्न नाही असे न्यायालयाला दिसून येईल त्या बाबतीत, ते पत्नीच्या किंवा पतीच्या अर्जावरुन कार्यवाहीचा खर्च आणि कार्यवाही चालू असताना दरमहा, विनंतीअर्जदाराचे स्वत:चे उत्पन्न लक्षात घेता न्यायालयास वाजवी वाटेल अशी रक्कम उत्तरवादीने विनंतीअर्जदाराला द्यावी असा आदेश देऊ शकेल :
१.(परंतु कार्यवाहीचा खर्च आणि कार्यवाही चालू असताना अशा दरमहा रकमे साठीच्या अर्जासाठी यथासंभव, यथास्थिति, पत्नी किंवा पतिला नोटीस बजावल्यापासून साठ दिवसांच्या आत दिला जाईल.)
१.(परन्तु कार्यवाही के व्ययों और कार्यवाही के दौरान ऐसी मासिक राशि के संदाय के लिए आवेदन को यथासंभव, यथास्थिति, पत्नी या पति पर सूचना की तामील की तारीख से, साठ दिन के भीतर निपटाया जाएगा।)
——–
१. २००१ चा अधिनियम ४९ कलम ८ द्वारे समाविष्ट केले.