हिंदू विवाह अधिनियम १९५५
कलम २३क :
१.(घटस्फोटाच्या व अन्य कार्यवाहीमध्ये उत्तरवादीला अनुतोष :
घटस्फोटाच्या किंवा न्यायिक फारकतीच्या किंवा दांपत्याधिकारांचे प्रत्यास्थापन करण्याच्या कोणत्याही कार्यवाहीमध्ये, विनंती अर्जदाराचे परगमन, क्रौर्य वा त्याने केलेला अभित्याग या कारणास्तव उत्तरवादी अनुतोषाच्या मागणीला विरोध करु शकेल, इतकेच नव्हे तर त्या कारणास्तव स्वत:ला अनुतोष मिळावा असा या अधिनियमाखाली प्रतिदावाही करु शकेल; आणि जर विनंतीअर्जदाराने परगमन, क्रौर्य वा अभित्याग केल्याचे शाबीत झाले तर, उत्तरवादीने त्या कारणास्तव विनंतीअर्ज सादर करुन अनुतोषाची मागणी केली असती तर त्याला किंवा तिला जो अनुतोष मिळण्याचा हक्क प्राप्त झाला असता असा या अधिनियमाखालील कोणताही अनुतोष न्यायालय त्या उत्तरवादीला देऊ शकेल.)
——-
१. १९७६ चा अधिनियम ६८ कलम १७ द्वारे घातले.