Hma 1955 कलम २२ : १.(कार्यवाही जनान्तिकपणे करावी व अशा वेळी तिचे कामकाजवृत्त मुद्रित किंवा प्रकाशित करु नये :

हिंदू विवाह अधिनियम १९५५
कलम २२ :
१.(कार्यवाही जनान्तिकपणे करावी व अशा वेळी तिचे कामकाजवृत्त मुद्रित किंवा प्रकाशित करु नये :
१) या अधिनियमाखालील प्रत्येक कार्यवाही जनान्तिकपणे चालवली जाईल आणि कोणत्याही व्यक्तीने अशा कोणत्याही कार्यवाहीसंबंधातील कोणतीही बाब मुद्रित किंवा प्रकाशित करणे कायदेशीर होणार नाही – मात्र न्यायालयाच्या पूर्वपरवानगीने मुद्रित वा प्रकाशित केलेला उच्च न्यायालयाचा अथवा सर्वोच्च न्यायालयाचा न्यायनिर्णय याला अपवाद असेल.
२) जर कोणत्याही व्यक्तीने पोटकलम (१) मध्ये अंतर्भूत असलेल्या उपबंधाचे व्यतिक्रमण करुन काणतीही बाब मुद्रित किंवा प्रकाशित केली तर, ती व्यक्ती एक हजार रुपयांपर्यंत असू शकेल एवढ्या द्रव्यदंडास दायी होईल.)
——-
१. १९७६ चा अधिनियम ६८ कलम १५ द्वारे भूळ कलम २२ ऐवजी घातले.

Leave a Reply