हिंदू विवाह अधिनियम १९५५
कलम २१ख :
या अधिनियमाखालील विनंतीअर्जाची संपरीक्षा करुन ते निकालात काढण्याविषयी विशेष उपबंध :
१) या अधिनियमाखाली विनंतीअर्जाच्या संपरीक्षेचे काम हे, त्या संपरीक्षेसंबंधात न्यायानुकूलतेच्या दृष्टीने व्यवहार्य असेल तेथवर रोजच्या रोज चालू ठेवून पूर्ण करण्यात येईल – मात्र एरव्ही पुढील दिवसापर्यंत तहकूब करावयाचे संपरीक्षेचे काम त्यापलिकडेदेखील तहकूब करणे न्यायालयाला काही कारणास्तव आवश्यक वाटले तर, त्याला ती कारणे नमूद करावी लागतील.
२) या अधिनियमाखालील प्रत्येक विनंतीअर्जाची संपरीक्षा शक्य तेवढ्या त्वरेने करण्यात येईल आणि उत्तरवादीवर विनंतीअर्जाची नोटीस बजावल्याच्या तारखेपासून सहा महिन्यांच्या आत संपरीक्षेचे काम पूर्ण करण्यासाठी नेटाने प्रयत्न करण्यात येईल.
३) या अधिनियमाखालील प्रत्येक अपिलाची सुनावणी शक्य तेवढ्या त्वरेने करण्यात येईल आणि उत्तरवादीवर त्या अपिलाची नोटीस बजावण्यात आल्याच्या तारखेपासून तीन महिन्यांच्या आत सुनावणीचे काम पूर्ण करण्यासाठी नेटाने प्रत्यत्न करण्यात येईल.)
——-
१. १९७६ चा अधिनियम ६८ कलम १४ द्वारे घातले.