Hma 1955 कलम १ : संक्षिप्त नाव व विस्तार :

हिंदू विवाह अधिनियम १९५५
(१९५५ चा अधिनियम क्रमांक २५)
१.(५ डिसेंबर १९९१ रोजी यथाविद्यमान)
हिंदूंमधील विवाहासंबंधीचाा कायदा विशोधित व संहिताबद्ध करण्यासाठी अधिनियम.
भारतीय गणराज्याच्या सहाव्या वर्षी संसदेकडून पुढीलप्रमाणे अधिनियमित होवो :-
प्रारंभिक :
कलम १ :
संक्षिप्त नाव व विस्तार :
१) या अधिनियमास हिंदू विवाह अधिनियम १९५५ असे म्हणता येईल.
२) त्याचा विस्तार २.(***) संपूर्ण भारतभर आहे, आणि ज्या राज्यक्षेत्रांवर या अधिनियमाचा विस्तार आहे त्यामध्ये अधिवासी असलेले जे हिंदू उक्त राज्यक्षेत्रांबाहेर असतील त्यांनाही तो लागू आहे.
———-
१. १९६३ चा विनियम ६, कलम २ व १ ली अनुसूची यांद्वारे दादरा व नगरहवेली यांना हा अधिनियम, दिनांक १ जुलै १९६५ पासून लागू करण्यात आला आणि १९६३ चा विनियम ७, कलम ३ व १ ली अनुसूची यांद्वारे सुधारणा करुन तो पाँडिचेरीला दिनांक १ नोव्हेंबर १९६३ पासून लागू करण्यात आला.
२. जम्मू व काश्मीर राज्य खेरीजकरुन शब्द २०१९ चा ३४ कलम ९५ व पाचव्या अनुसची नुसार गाळले.

Leave a Reply