हिंदू विवाह अधिनियम १९५५
कलम १८ :
हिन्दू विवाहाच्या अन्य विवक्षित शर्तींच्या व्यतिक्रमणाबद्दल शिक्षा :
जी जी व्यक्ती कलम ५ च्या खंड (तीन), चार १.(व (पाच)) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या शर्तींचे व्यतिक्रमण करुन या अधिनियमाखाली स्वत:चा विवाह विधिपूर्वक घडवून आणील अशी प्रत्यके व्यक्ती, –
२.(क) कलम ५ च्या खंड (तीन) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या शर्तींच्या व्यतिक्रमणाच्या बाबतीत, दोन वर्षांपर्यंत असू शकेल अशा कठोर कारावासास, किंवा एक लाख (लक्ष) रुपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडास, किंवा दोन्ही शिक्षांस;)
ख) कलम ५ च्या खंड (चार) किंवा खंड (पाच) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या शर्तीच्या व्यतिक्रमणाच्या बाबतीत, एक महिन्यापर्यंत असू शकेल अशा साध्या कारावासास, किंवा एक हजार रुपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडास किंवा दोन्ही शिक्षांस;
३.(***)
पात्र असेल.
४.(***)
———
१. १९७८ चा अधिनियम २ कलम ६ व अनुसूची यांद्वारे मूळ मजकुराऐवजी घातले.
२. २००७ के अधिनियम सं० ६ की धारा २० द्वारा प्रतिस्थापित ।
३. १९७८ चा अधिनियम २ कलम ६ व अनुसूची यांद्वारे गाळले.
४. १९७८ चा अधिनियम २ कलम ६ व अनुसूची यांद्वारे गाळले.