हिंदू विवाह अधिनियम १९५५
कलम १६ :
१.(शून्य व शन्यकरणीय विवाह संबंधातून निर्माण झालेल्या अपत्यांची औरसता :
१) कलम ११ खाली एखादा विवाह शून्य व रद्दबातल असला तरीसुद्धा, अशा विवाहसंबंधातून झालेले जे अपत्य, तो विवाह विधिग्राह्य असता तर औरस ठरले असते असे कोणतेही अपत्य औरस ठरेल, – मग ते अपत्य विवाहविषयक कायदे (विशोधन) अधिनियम १९७६ (१९७६ चा ६८) संबंधातून निर्माण याच्या प्रारंभापूर्वी जन्मलेले असो वा नंतर जन्मलेले असो, आणि त्या विवाहाच्या बाबतीत या अधिनियमान्वये शून्यतेचा हुकूमनामा देण्यात आलेला असो वा नसो आणि या अधिनियमाखाली विनंतीअर्ज केल्यावरुन नव्हे तर अन्यथा तो विवाह रद्दबातल ठरवण्यात आलेला असो वा नसो.
२) शून्यकरणीय विवाहाबाबत कलम १२ खाली शून्यतेचा हुकूमनामा देण्यात आलेला असेल त्या बाबतीत तो हुकूमनामा करण्यापूर्वी जन्मास घातलेले किंवा गर्भहित झालेले जे अपत्य, हुकूमानाम्याच्या तारखेस तो विवाह शून्य ठरण्याऐवजी त्याचा विच्छेद झाला असता तर त्या विवाहसंबंधातील दोन्ही पक्षांचे औरस अपत्य ठरले असते असे कोणतेही अपत्य, शून्यीकरणाचा हुकूमनामा काढला असला तरीसुद्धा त्या पक्षांचे औरस अपत्य मानण्यात येईल.
३) जो विवाह कलम १२ खाली शून्य व रद्दबातल झाला आहे किंवा शून्यतेच्या हुकूमनाम्याद्वारे शून्य झाला आहे अशा विवाहाच्या संबंधातून जन्मलेले कोणतेही अपत्य, हा अधिनियम पारित झाला नसता तर असे अपत्य आपल्या मात्यापित्यांचे औरस अपत्य नसल्याकारणाने त्याच्या मात्यापित्यांहून अन्य अशा कोणत्याही व्यक्तींच्या संपत्तीतील किंवा संपत्तीवरील कोणतेही हक्क बाळगण्यास वा संपादन करण्यास अक्षम झाले असते अशा कोणत्याही प्रकरणी, पोटकलम (१) किंवा पोटकलम (१) किंवा पोटकलम (२) मध्ये अंतर्भूत असलेल्या कोणत्याही गोष्टीमुळे अशा अपत्याला असे कोणतेही हक्क प्रदान होतात असा तिचा अर्थ लावला जाणार नाही.)
——-
१. १९७६ चा अधिनियम ६८ कलम ११ द्वारे मूळ कलम १६ ऐवजी घातले.