Fssai कलम ३२ : सुधारणा सूचना (नोटीस) :

अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६
कलम ३२ :
सुधारणा सूचना (नोटीस) :
१) जर नियुक्त अधिकाऱ्याकडे असे मानण्याचे वाजवी कारण असेल की कोणताही अन्न (खाद्य) व्यावसायिक हे कलम लागू असलेल्या कोणत्याही विनियमांचे पालन करण्यात अयशस्वी ठरले आहे, तर तो अन्न (खाद्य) व्यावसायिकाला सूचना (नोटीस) बजावू शकतो (या अधिनियमात ज्याला सुधारणा सूचना (नोटीस) असे म्हटले आहे ) –
(a) क) अन्न (खाद्य) व्यावसायिक विनियमाचे पानल करण्यास अयशस्वी ठरला आहे असे मानण्याची कारणे नमूद करील;
(b) ख) अन्न (खाद्य) व्यावसायिक अशा प्रकारे अयशस्वी ठरला असेल अशा बाबी विनिर्दिष्ट करील;
(c) ग) उक्त प्राधिकाऱ्याचे मते, अन्न (खाद्य) व्यावसायिकाला अनुपालन सुनिश्चित करण्यासाठी (पालनासाठी) जे उपाय करावे लागतील ते विनिर्दिष्ट करील; आणि
(d) घ) अन्न (खाद्य) व्यावसायिक सुचविलेल्या उपाययोजनेच्या समतुल्य तरी असेल अशी उपाययोजना सूचनेमध्ये (नोटीशीमध्ये) विनिर्दिष्ट केलेला आहे अशा युक्तियुक्त कालावधीत (चौदा दिवसांपेक्षा कमी नसेल असा) करील.
२) जर अन्न (खाद्य) व्यायसायिकाने सुधारणा सूचनेचे (नोटीशीचे) पालन केले नाही तर त्याची अनुज्ञप्ती (परवाना) निलंबित होऊ शकेल.
३) अन्न (खाद्य) व्यावसायिक अजूनही सुधारणा सूचनेचे (नोटीशीचे) पालन करण्यात अयशस्वी झाल्यास, नियुक्त अधिकारी, अनुज्ञप्ती (परवाना) धारकाला कारणे दाखविण्याची संधी दिल्यानंतर, त्याला दिलेली अनुज्ञप्ती (परवाना) रद्द करु शकेल :
परंतु असे की, नियुक्त अधिकारी लोक स्वास्थ्याच्या (आरोग्याच्या) हितासाठी कोणतीही अनुज्ञप्ती (परवाना) लेखी कारणे देऊन ताबडतोब निलंबित करु शकेल.
४) असा कोणतीही व्यक्ती निम्नलिखित कारणामुळे,
(a) क) सुधारणा सूचना (नोटीस); किंवा
(b) ख) सुधारणेबाबत प्रमाणपत्र जारी करण्यास नकार देने; किंवा
(c) ग) या अधिनियमास अधीन राहून अनुज्ञप्ति (परवाना) रद्द करणे, निलंबन करणे किंवा मागे घेणे,
बाधित झाली असेल तर, ती अन्न (खाद्य) सुरक्षा आयुक्ताकडे अपील करु शकेल, त्याचा त्यावरचा निर्णय अंतिम असेल.
५) अपील सादर करण्याकरिताचा कालावधी निम्नलिखित प्रमाणे असेल,-
(a) क) अपील करण्यास इच्छूक असलेल्या व्यक्तीवर निर्णय सूचनेची (नोटीशीची) बजावणी झाल्यापासून पंधरा दिवसांच्या आत; किंवा
(b) ख) पोटकलम (१) च्या अंतर्गत अपीलच्या बाबतीत अपील करायचे असल्यास, वरील कालावधी किंवा सुधारणा सूचनेत (नोटीशीत) दिलेला कालावधी यांतील जो प्रथम सपतो तो;
स्पष्टीकरण :
या पोटकलमाच्या प्रयोजनासाठी, तक्रार दाखल करणे हे अपील सादरीकरण आहे असे गृहीत धरले जाईल.

Leave a Reply