अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६
कलम ९ :
अन्न (खाद्य) प्राधिकरणाचे अधिकारी व अन्य कर्मचारी :
१) अन्न (खाद्य) प्राधिकरणाचा एक मुख्य कार्यकारी अधिकारी असेल जो भारत सरकारच्या अतिरिक्त सचिवाच्या दर्जापेक्षा कमी नसेल आणि जो केंद्र सरकारद्वारे नियुक्त केला जाणारा प्राधिकरणाचा सदस्य सचिव असेल.
२) अन्न (खाद्य) प्राधिकरण, केंद्र सरकारच्या मान्यतेने, अन्न (खाद्य) प्राधिकरणाला त्याचे कार्य पार पाडण्यासाठी आवश्यक असलेल्या इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या, स्वरूप आणि श्रेणी निश्चित करू शकेल.
३) मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी आणि इतर कर्मचाऱ्यांना देय असलेले वेतन आणि भत्ते आणि सेवांच्या इतर अटी केंद्र सरकारच्या मान्यतेने अन्न (खाद्य) प्राधिकरणाने केलेल्या नियमांद्वारे निर्दिष्ट केल्या जातील.