अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६
कलम ८ :
अन्न (खाद्य) प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि सदस्य यांना पदावरुन कमी करणे किंवा दूर करणे :
१) कलम ७ च्या पोटकलम (१) मध्ये काहीही असले तरी, केन्द्र सरकार आदेशाद्वारे अध्यक्ष किंवा कोणत्याही अन्य सदस्यास पढे दिलेल्या कारणावरुन पदावरुन काढू शकेल, यथास्थिति, जर अध्यक्ष किंवा अन्य सदस्य,-
(a) क) दिवाळखोर म्हणून न्यायालयाने घोषित केले असल्यास; किंवा
(b) ख) केन्द्र सरकारच्या मते, नैतिक पतनाचा समावेश असलेल्या गुन्ह्यासाठी दोषी ठरविण्यात आले असेल; किंवा
(c) ग) सदस्य म्हणून कार्य करण्यास शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या असमर्थ झाला असेल; किंवा
(d) घ) सदस्य या नात्याने त्याच्या कार्यावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असलेले असे आर्थिक किंवा इतर हितसंपादन; किंवा
(e) ङ) आपल्या पदाचा अशा प्रकारे गैरवापर केला आहे की आपल्या पदावर कायम राहिल्याने जनहितावर विपरीत परिणाम होईल.
२) पोटकलम (१) च्या खंड (घ) (e)आणि खंड (ङ) (e)अंतर्गत कोणत्याही सदस्याला त्याला त्याची बाजू मांडण्याची वाजवी संधी दिल्याशिवाय त्याला पदावरुन दूर केला जाणार नाही.