अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६
कलम ७ :
अन्न (खाद्य) प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि सदस्य याचा पदावधी, वेतन, भत्ते व सेवेच्या इतर शर्ती :
१) अध्यक्ष आणि पदसिद्ध (पदिय) सदस्यांव्यतिरिक्त इतर सदस्यांचा कालावधी पदग्रहणाच्या तारखेपासून तीन वर्षाचा असेल व ते पुन्हा तीन वर्षाच्या नियुक्तीकरिता पात्र असतील :
१.(परंतु असे की, अध्यक्ष वयाची पासष्ट वर्षे पूर्ण झाल्यानंतर असे पद धारण करणार नाही.)
२) अध्यक्ष आणि पदसिद्ध (पदिय) सदस्यांव्यतिरिक्त इतर सदस्यांचे देय असलेले वेतन आणि भत्ते आणि सेवाशर्ती केन्द्र सरकारने विहित केल्याप्रमाणे असतील.
३) अध्यक्ष आणि प्रत्येक सदस्य आपले पद ग्रहण करण्यापूर्वी केन्द्र सरकारने विहित केले असेल अशा प्रकारे व अशा रीतीने व अशा प्राधिकाऱ्यासमक्ष, पदाची व गोपनीयतेची शपथ ग्रहण करील.
४) पोटकलम (१) मध्ये काहीही असले तरी, अध्यक्ष किंवा कोणताही सदस्य –
(a) क) केन्द्र सरकारला कमीत कमी तीन महिन्यांची लेखी सूचना देऊन आपले पद त्याग करु शकेल;
(b) ख) कलम ८ च्या तरतुदीस अनुसार त्याला पदावरुन कमी केले जाईल.
५) अध्यक्ष किंवा कोणताही सदस्य अशा प्रकारे पदावरुन दूर झाल्यानंतर कोणत्याही रीतीने अन्न (खाद्य) प्राधिकरण किंवा राज्य प्राधिकरणासमोर कोणत्याही व्यक्तीचे कोणत्याही प्रकारे प्रतिनिधित्व करणार नाही.
——–
१. २००८ चा अधिनियम क्रमांक १३ याच्या कलम ४ द्वारा मूळ मजुकराऐवजी समाविष्ट केले.