Fssai कलम ७८ : उत्पादक, इत्यादींना पक्षकार बनविण्याची न्यायालयाचे अधिकार (शक्ती) :

अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६
कलम ७८ :
उत्पादक, इत्यादींना पक्षकार बनविण्याची न्यायालयाचे अधिकार (शक्ती) :
जेव्हा या अधिनियमान्वये घडलेल्या कोणत्याही अपराधाच्या खटल्यात कोणत्याही वेळी जो अन्नपदार्थाचा आयातदार, उत्पादक, वितरक किंवा विक्रेता नाही अशा व्यक्तीने अपराध केला असल्याचा आरोप असेल व त्या प्रकरणी न्यायालय प्रस्तुत पुराव्यानंतर अशा निष्कर्षास येऊन पाहोचेल की आयातदार, उत्पादक, वितरक किंवा विक्रेताही या अपराधाशी संबंधित आहे तेव्हा, फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ (१ जुलै २०२३ पासून भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ कलम ३५८ (३)) याच्या कलम ३१९ च्या पोटकलम (३) किंवा या अधिनियमाच्या कलम ७१ मध्ये काहीही म्हटले असले तरी न्यायालय अशा व्यक्तीविरुद्ध या अधिनियमाखाली फिर्याद दाखल केली आहे असे मानून पुढील कार्यवाही करु शकेल.

Leave a Reply