अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६
कलम ७२ :
दिवाणी न्यायालयांना अधिकारिता नसणे :
या अधिनियमाद्वारे अधिकार प्रदान केलेला न्यायनिर्णय अधिकारी किंवा न्यायाधिकरणाच्या कोणत्याही बाबीत दावा किंवा कायदेशीर कार्यवाही विचारार्थ घेण्याची अधिकारिता दिवाणी न्यायालयास नसेल व या अधिनियमाखालील अधिकारानुसार केलेल्या किंवा करावयाच्या कोणत्याही कृतीस कोणतेही न्यायालय किंवा इतर न्यायाधिकरण मनाई हुकूम देणार नाही.