अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६
कलम ६६ :
कंपन्यांनी केलेले अपराध :
१) या अधिनियमाखालील अपराध एखाद्या कंपनीने केला असेल तर, अपराध घडला त्यावेळी कंपनीची प्रभारी असलेली आणि जबाबदार असलेली प्रत्येक व्यक्ती, कंपनीचे कामकाज पार पाहणारी कंपनी त्या अपराधासाठी दोषी असल्याचे मानण्यात येईल व तिच्याविरुद्ध कारवाई करण्यास व त्यानुसार शास्तीस पात्र असेल :
परंतु असे की, एखाद्या कंपनीच्या वेगवेगळ्या आस्थापना किंवा शाखा असतील किंवा कोणत्याही आस्थापनेत किंवा शाखेत वेगवेगळी युनिट (एकक) असतील तर, अशी आस्थापना, शाखा, युनिट (एकक) याच्या अन्न (खाद्य) सुरक्षेसाठी जबाबदार म्हणून कंपनीने नामनिर्देशित केलेली प्रभारी व्यक्ती, अशा आस्थापनेतील, शाखेतील किंवा युनिटातील (एककातील) उल्लंघनासाठी जबाबदार असेल :
परंतु आणखी असे की, अशी व्यक्ती हे सिद्ध करु शकेल की अपराध त्याचे अपरोक्ष घडला आहे किंवा अपराध टाळण्यासाठी त्याने योग्य ती काळजी घेतली होती तर या अधिनियमात उपबंधित शास्तीसाठी त्याला जबाबदार धरले जाणार नाही.
२) पोटकलम (१) मध्ये काहीही असले तरी, या अधिनियमाखाली अपराध कंपनीने केला असेल व तो अपराध कंपनीचा संचालक, व्यवस्थापक, सचिव किंवा इतर अधिकारी यांचे संमतीने किंवा दुर्लक्षिततेमुळे किंवा उपेक्षेमुळे घडला आहे हे सिद्ध झाल्यास तो संचालक, व्यवस्थापक, सचिव किंवा इतर अधिकारी या अपराधाकरिता दोषी आहेत असे मानले जजाईल व त्यांचे विरुद्ध कारर्वाई करण्यास व त्यानुसार शिक्षा होण्यास ते पात्र असतील.
स्पष्टीकरण :
या कलमाच्या प्रयोजनासाठी,-
(a) क) कंपनी म्हणजे कोणताही निगम निकाय होय आणि यात पेढी (फर्म) किंवा व्यक्तिगत संघटनांचा समावेश होतो; आणि
(b) ख) पेढीच्या (फर्मच्या) संबंधात संचालक म्हणजे त्या पेढीचा (फर्मचा) भागीदार अभिप्रेत आहे.