Fssai कलम ६४ : पश्चात्वर्ती (नंतरच्या) अपराधांसाठी शास्ती :

अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६
कलम ६४ :
पश्चात्वर्ती (नंतरच्या) अपराधांसाठी शास्ती :
१) या अधिनियमान्वये शिक्षापत्रा अपराधासाठी पूर्वी दोषी ठरलेल्या कोणत्याही व्यक्तीने त्यानंतर असाच अपराध केला असेल आणि ती त्या अपराधासाठी दोषसिद्ध ठरली असेल तर, ती व्यक्ती,-
एक) पहिल्या दोषसिद्ध अपराधासाठी प्रदान केलेल्या कमाल शिक्षेच्या पुन्हा तोच अपराध केल्यास त्या उपबंधित शिक्षेच्या अधिकतम शिक्षेस आरि दुप्पट दंडास जबाबदार असेल;
दोन) दर दिवसासाठी एक लाख रुपयांपर्यंतचा द्रव्यदंड, अपराध पुढे चालू रहात असणारा असेल तर; आणि
तीन) त्याची अनुज्ञप्ती (परावाना) रद्द केली जाईल.
२) न्यायालय, या व्यतीरिक्त अपराध्याच्या खर्चाने, अपराध्याचे नाव आणि त्याचे राहण्याचे ठिकाण, अपराध आणि शास्ती अशा वृत्तपत्रांमध्ये किंवा न्यायालयाच्या निर्देशानुसार इतर पद्धतीने प्रकाशित करु शकेल आणि अशा प्रकाशनाचा खर्च दोषसिद्ध होण्याचा खर्चाचा भाग मानला जाईल आणि तो दंडाच्या स्वरुपात वसूल केला जाईल.

Leave a Reply