Fssai कलम ६३ : अनुज्ञप्ती (परवाना) विना व्यवसाय चालू ठेवण्यास १.(शास्ती) :

अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६
कलम ६३ :
अनुज्ञप्ती (परवाना) विना व्यवसाय चालू ठेवण्यास १.(शास्ती) :
जर कोणतीह व्यक्ती किंवा अन्न (खाद्य) व्यावसायिक (या अधिनियमाच्या कलम ३१ च्या पोटकलम (२) अन्वये अनुज्ञप्ती (परवाना) घेण्यात सूट देण्यात आलेल्या व्यक्तीं व्यतिरिक्त) स्वत: किंवा त्याच्या वतीने, अनुज्ञप्ती (परवाना) घेणे आवश्यक अशा व्यक्तीच्या वतीने कोणत्याही व्यक्ती द्वारे, अनुज्ञप्ती (परवाना) शिवाय कोणत्याही अन्न (खाद्य) पदार्थाचे उत्पादन, विक्री, साठवणूक किंवा वितरण किंवा आयात करील तर ती व्यक्ती २.(दहा लाख रुपयांपर्यंत असू शकेल इतक्या शास्तिस) पात्र ठरेल.
——-
१. जन विश्वास (संशोधन) अधिनियम २०२३ (२०२३ चा १८) च्या कलम २ आणि अनुसूची द्वारा (दंड) या मजकुराऐवजी समाविष्ट केले.
२. जन विश्वास (संशोधन) अधिनियम २०२३ (२०२३ चा १८) च्या कलम २ आणि अनुसूची द्वारा (महिन्यांपर्यंत असू शकेल इतक्या कालावधीच्या कारावासाची आणि एक लाख रुपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाच्या शिक्षेस) या मजकुराऐवजी समाविष्ट केले.

Leave a Reply