अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६
कलम ६१ :
मिथ्या (खोटी) महिती पुरविल्यास १.(शास्ती) :
जर कोणतीही व्यक्ती, या अधिनियमान्वये किंवा त्याखालील निदेशांद्वारे आवश्यक असल्यानुसार, जी खोटी आहे किंवा दिशाभूल करणारी आहे असे माहित असताना अशी कोणतीही माहिती पुरवील ती व्यक्ती २.(दहा लाख रुपयांपर्यंत असू शकेल इतक्या शास्तिस) पात्र ठरेल.
——-
१. जन विश्वास (संशोधन) अधिनियम २०२३ (२०२३ चा १८) च्या कलम २ आणि अनुसूची द्वारा (दंड) या मजकुराऐवजी समाविष्ट केले.
२. जन विश्वास (संशोधन) अधिनियम २०२३ (२०२३ चा १८) च्या कलम २ आणि अनुसूची द्वारा (तीन महिन्यांपर्यंत असू शकेल इतक्या कालावधीच्या कारावासाच्या शिक्षेस आणि दोन लाख रुपयांपर्यंत असू शकेल इतक्या शिक्षेस) या मजकुराऐवजी समाविष्ट केले.