अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६
कलम ५५ :
अन्न (खाद्य) सुरक्षा अधिकाऱ्याच्या निर्देशांचे पालन न केल्यास शास्ती :
जर कोणताही अन्न (खाद्य) व्यावसायिक किंवा आयातदार वाजवी कारणाशिवाय अन्न (खाद्य) सुरक्षा अधिकाऱ्याने या अधिनियमान्वये किंवा त्याखालील नियम किंवा विनियमांप्रमाणे किंवा जारी केलेल्या आदेशाप्रमाणे आवश्यक असलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन न केल्यास तो दोन लाख रुपयांपर्यंतच्या द्रव्यदंडाच्या शिक्षेस पात्र असेल.