अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६
कलम ५३ :
भ्रामक जहिरातींसाठी शास्ती :
१) कोणतीही व्यक्ती,
(a) क) कोणत्याही अन्नाचे (खाद्याचे) मिथ्या (खोटे) वर्णन करणारी; किंवा
(b) ख) कोणत्याही अन्नाचे (खाद्याचे) स्वरुप किंवा सत्व किंवा दर्जाबाबत खोटी हमी देईल किंवा दिशाभूल करणारी जाहिरात प्रसिद्ध करील किंवा जाहिरातीच्या प्रसिद्धीत सहभागी होईल,
ती व्यक्ती दहा लाख रुपयांपर्यंतच्या द्रव्यदंडाच्या शिक्षेस पात्र ठरेल.
२) कोणत्याही कार्यवाहीत ज्या अन्न (खाद्य) पदार्थाच्या संबंधात उल्लंघन झाल्याचे मानण्यात आले असेल अशा कोणत्याही अन्न (खाद्य) पदार्थाशी संबंधित वेष्टन (लेबल) किंवा जाहिरात यावर त्या अन्न (खाद्य) पदार्थातील घटकांचे अचूक विवरण आहे यामुळे न्यायालयास, उल्लंघन करण्यात आले आहे असा निष्कर्ष काढण्यापासून परावृत्त केले जाणार नाही.