अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६
प्रकरण २ :
भारतीय अन्न (खाद्य) सुरक्षा आणि मानक प्राधिकरण :
कलम ४ :
भारतीय अन्न (खाद्य) सुरक्षा आणि प्राधिकरणाची स्थापना :
१) केन्द्र सरकार, या अधिनियमान्वये त्याला प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करण्यासाठी आणि नेमून दिलेल्या कृत्यांचे पालन करण्यासाठी भारतीय अन्न (खाद्य) सुरक्षा आणि प्राधिकरण म्हणून ओळखली जाणारी संस्था स्थापन करेल.
२) अन्न (खाद्य) प्राधिकरण पूर्वोक्त नावाचे निगम मंडळ असेल, ज्याला जंगम आणि स्थावर मालमत्तेचे अधिग्रहण, धारण आणि विल्हेवाट लावण्याची आणि संविदा (करार) करण्याची शक्ती सोबत शाश्वत उत्तराधिकार असेल आणि त्याची एक सामान्य मोहोर असेल आणि त्या नावाने फिर्याद (दावा) करण्याची किंवा फिर्याद लढविण्याची शक्ती असेल.
३) अन्न (खाद्य) प्राधिकरणाचे मुख्य कार्यालय दिल्ली मध्ये असेल;
४) अन्न (खाद्य) प्राधिकरण भारतात कोणत्याही इतर ठिकाणी त्याची कार्यालये प्रस्थापित करु शकेल.