Fssai कलम ४५ : अन्न (खाद्य) विश्लेषक :

अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६
कलम ४५ :
अन्न (खाद्य) विश्लेषक :
अन्न (खाद्य) सुरक्षा आयुक्त त्यांना योग्य वाटतील व ज्यांनी केन्द्र सरकाने विहित केलेली शैक्षणिक पात्रता धारण केली आहे अशा व्यक्तींची अन्न (खाद्य) सुरक्षा आयुक्त त्यांना नेमून दिलेल्या स्थानिक क्षेत्रांकरिता अन्न (खाद्य) विश्लेषक म्हणून, अधिसूचनेद्वारे, नियुक्त करु शकेल :
परंतु असे की, अन्नाच्या (खाद्याच्या) कोणत्याही वस्तुच्या उत्पादनात किंवा विक्रीमध्ये आर्थिक हितसंबंध असलेल्या कोणत्याही व्यक्तीला या कलमाखाली अन्न (खाद्य) विश्लेषक म्हणून नियुक्त केले जाणार नाही :
परंतु आणखी असे की, वेगवेगळ्या अन्न (खाद्य) पदार्थांसाठी वेगवेगळे अन्न (खाद्य) विश्लेषक नियुक्त करता येतील.

Leave a Reply