अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६
कलम ३४ :
आणीबाणीच्या काळातील प्रतिबंधात्मक सूचना आणि आदेश :
१) निर्देशित (नियुक्त) अधिकाऱ्याचे असे मत असेल की, कोणत्याही अन्न (खाद्य) व्यवसायात आरोग्यास (स्वास्थ्यास) धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे तर ती अन्न (खाद्य) व्यावसायिकावर सूचनेची बजावणी करुन (यापुढे या अधिनियमात याचा आप्तकालीन प्रतिबंधात्मक सूचना असा उल्लेख केला आहे) अन्न (खाद्य) सुरक्षा आयुक्तांकडे प्रतिबंध लादण्यासाठी अर्ज करेल.
२) अशा कोणत्याही अधिकाऱ्याचा असा अर्ज आल्यावर, कोणत्याही अन्न (खाद्य) व्यवसायात आरोग्य धोक्याची परिस्थिती निर्माण झाली आहे अशी खात्री पटल्यास तो आदेशाद्वारे प्रतिबंध लादेल.
३) निर्देशित (अधिकारी) प्रतिबंधात्मक आदेशासाठी तो पर्यंत अर्ज करणार नाही, जो पर्यंत अर्जाच्या तारखेच्या किमान एक दिवस आधी त्याने अन्न (खाद्य) व्यावसायिकाला प्रतिबंधक सूचनेची अंमलबजावणी केली नाही.
४) आपातकालीन प्रतिबंधात्मक आदेश दिल्यानंतर लवकरात लवकर निर्देशित अधिकारी अन्न (खाद्य) सुरक्षा अधिकाऱ्याकडून निम्नलिखित बाबींच्या जरुरी कार्यवाहीची अपेक्षा करेल,-
(a) क) अन्न (खाद्य) व्यावसायिकावर आदेशाच्या प्रतीची अंमलबजावणी; किंवा
(b) ख) अशा व्यवसायासाठी वापरात असलेल्या जागेच्या दर्शनी भागावर आदेशाची प्रत चिकटवणे,
आणि कोणतीही व्यक्ती जाणूनबुजून या आदेशाचे उल्लंघन करील तर तो अपराधासाठी दोषी ठरेल आणि तो दोन वर्षापर्यंतच्या कालवधीच्या कारावासाच्या शिक्षेस व दोन लाखापर्यंतच्या द्रव्यदंडास पात्र ठरेल.
५) अन्न (खाद्य) व्यावसायिकाने केलेल्या उपाययोजनांवरुन समाधान झाल्यामुळे निर्देशित अधिकाऱ्याने आदेश उठावण्याबाबत शिफारशीचे प्रमाणपत्र दिलेले असेल तर, आपातकालीन प्रतिबंधात्मक आदेश अमलात राहणार नाही.
६) निर्देशित अधिकारी पोटकलम (५) अन्वये देण्यात येणारे प्रमाणपत्र, अन्न (खाद्य) व्यावसायिकाने केलेल्या अर्जाच्या दिवसांपासून सात दिवसांचे आत देईल व त्याचे समाधान न झाल्यास त्याची सूचना अन्न (खाद्य) व्यावसायिकाला दहा दिवसांच्या आत दिली जाईल व त्यात निर्णयाची कारणे सूचित करील.