अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६
प्रकरण ७ :
अधिनियमाची अंमलबजावणी :
कलम २९ :
अधिनियमाच्या अंमलबजावणीसाठी जबाबदार प्राधिकरणे :
१) अन्न (खाद्य) प्राधिकारी आणि राज्य अन्न (खाद्य) सुरक्षा प्राधिकारी या अधिनियमाच्या अंमलबजावणीकरिता जबाबदार असेल.
२) अन्न (खाद्य) प्राधिकारी आणि राज्य अन्न (खाद्य) सुरक्षा प्राधिकारी अन्न (खाद्य) व्यवसायिकांकडून अन्न (खाद्य) व्यवसायाच्या सर्व स्तरांवर कायद्याशी सुसंगत आवश्यकतांची पूर्तता होत आहे किंवा नाही यावर देखरेख करतील आणि सत्यापित करतील.
३) प्राधिकारी परिस्थितीला योग्य नियंत्रण प्रणाली आणि अन्न (खाद्य) सुरक्षा व जोखीम, अन्न (खाद्य) सुरक्षेची देखरेख व अन्न (खाद्य) व्यवसायाच्या सर्व स्तरांचा समावेश असलेल्या इतर संनियंत्रक कृतींबाबत लोकांना कळविण्यासाठी नियंत्रण व इतर कृतींची यंत्रणा राबवील.
४) अन्न (खाद्य) सुरक्षा अधिकारी त्यांच्या क्षेत्रात या अधिनियमाच्या त्या तरतुदी लागू आणि अंमलात आणतील ज्याच्या संदर्भात इतर कोणत्याही प्राधिकरणावर स्पष्टपणे किंवा आवश्यक अर्थाने कर्तव्य लादलेली नाहीत.
५) कोणते अन्न (खाद्य) सुरक्षा अधिकारी साधारणत: किंवा विशेषत: कोणत्या क्षेत्रात अंमलबजावणीची कार्यवाही करेल आरि असे विनियम किंवा आदेश हे प्राधिकरणास प्रशासकीय विनियम व आदेश तयार करण्यास सहाय्यक व माहिती पुरविणारे असतील जेणेकरुन निरनिराळ्या संबंधित प्राधिकरणास त्यांच्या संबंधित कार्याबद्दल या अधिनियमाच्या कोणत्याही तरतुदींत व कोणत्याही प्राधिकरणास त्या उपयुक्त ठरतील या बाबी या अधिनियमातील विनियमांत विनिर्दिष्ट करतील.
६) अन्न (खाद्य) सुरक्षा आयुक्त आणि अभिहित अधिकारी हे अन्न (खाद्य) सुरक्षा अधिकाऱ्याला दिलेले अधिकार वापरतील आणि या अधिनियमात विनिर्दिष्ट केलेल्या प्रक्रियेचे पालन करतील.