Fssai कलम २७ : उत्पादक, आवेष्टक, ठोक विक्रेते, वितरक, आणि विक्रेते यांची दायित्वे (जबाबदारी) :

अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६
कलम २७ :
उत्पादक, आवेष्टक, ठोक विक्रेते, वितरक, आणि विक्रेते यांची दायित्वे (जबाबदारी) :
१) कोणत्याही अन्न (खाद्य) पदार्थाचा उत्पादक किंवा आवेष्टक, या अधिनियमाच्या किंवा त्याखाली बनविलेल्या नियमांचे आणि विनियमांचे पालन करत नसेल तर, अन्न (खाद्य) पदार्थाच्या बाबतीत जबाबदार असतील.
२) ठोक विक्रेता किंवा वितरक या अधिनियमान्वये अन्न (खाद्य) पदार्थाच्या बाबतीत निम्नलिखित गोष्टीसाठी जबाबदार असतील, अर्थात :-
(a) क) मुदत संपल्याच्या तारखेनंतर पुरवठा केल्यास; किंवा
(b) ख) उत्पादकाने दिलेल्या सुरक्षा अनुदेशाचा भंग करुन, साठवणून किंवा पुरवठा केल्यास; किंवा
(c) ग) असुरक्षित किंवा मिथ्याछाप वाले अन्न (खाद्य) पदार्थ असल्यास; किंवा
(d) घ) ज्या उत्पादकाकडून अन्न (खाद्य) पदार्थ घेतला आहे त्याचा बोध होत नसल्यास; किंवा
(e) ङ) या अधिनियमाच्या किंवा त्याखाली केलेल्या नियम व विनियमांच्या तरतुदींचे उल्लंघन करुन साठवले जाते किंवा हाताळले किंवा ठेवले जाते; किंवा
(f) च) माल असुरक्षित आहे याची जाणीव असून घेतला असेल तर.
३) विक्रेता या अधिनियमाखाली अन्न (खाद्य) पदार्थाच्या बाबतीत निम्नलिखित गोष्टीसाठी जबाबदार असेल, अर्थात :-
(a) क) मुदत संपल्याच्या तारखेनंतर विकल्यास; किंवा
(b) ख) अस्वच्छ स्थितीत हाताळले किंवा ठेवले असल्यास; किंवा
(c) ग) मिथ्याछाप वाले असल्यास; किंवा
(d) घ) ज्या उत्पादकाकडून किंवा वितरकाकडून असा अन्न (खाद्य) पदार्थ घेतला आहे याचा बोध होत नसेल तर; किंवा
(e) ङ) असुरक्षित असल्याची जाणीव असून माल घेतला असल्यास.

Leave a Reply