Fssai कलम २६ : अन्न (खाद्य) पदार्थ व्यवसाय चालकाचे दायित्व (जबाबदारी) :

अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६
प्रकरण ६ :
अन्न (खाद्य) सुरक्षेसंबंधी विशेष दायित्व (जबाबदारी) :
कलम २६ :
अन्न (खाद्य) पदार्थ व्यवसाय चालकाचे दायित्व (जबाबदारी) :
१) प्रत्येक अन्न (खाद्य) व्यवसायिक त्याच्या नियंत्रणाखालील व्यवसायात उत्पादन, प्रकिया, आयात, वितरण आणि विक्री यांच्या प्रत्येक स्तरावरील अन्न (खाद्य) पदार्थ या अधिनियमाच्या व याखाली केलेल्या नियम आणि विनियमांच्या अपेक्षा (आवश्यकता) ची पूर्तता करत असल्याची खात्री करेल.
२) कोणताही अन्न (खाद्य) व्यवसायिक अशा अन्न (खाद्य) पदार्थाचे,-
एक) जे असुरक्षित असेल; किंवा
दोन) जे मिथ्याछाप वाले किंवा अप्रमाणित किंवा बाह्यपदार्थ मिश्रित असेल; किंवा
तीन) ज्यासाठी अनुज्ञप्तिची गरज असल्यास, त्या अनुज्ञप्तिच्या अटींना अनुसरुन नसेल; किंवा
चार) जे अन्न (खाद्य) प्राधिकरण किंवा केन्द्र सरकार किंवा राज्य सरकार द्वारा लोक स्वास्थ्य (जनेतेचे आरोग्य) च्या हिताच्या दुष्टीने पतिषिद्ध (प्रतिबंधित) असेल; किवा
पाच) या अधिनियमाच्या किंवा याखाली केलेल्या नियम किंवा विनियमांच्या तरतुदींचे उल्लंघन करत असेल,
स्वत: किंवा त्याच्या वतीने कोणत्याही व्यक्ती द्वारा उत्पादन (विनिर्माण), भांडारण (साठवण), विक्री किंवा वितरण करणार नाही.
३) कोणताही अन्न (खाद्य) व्यवसायी संक्रामक,संसर्गजन्य रोगाची लागण असलेल्या किंवा घृणित आजाराने ग्रस्त असलेल्या कोणत्याही व्यक्तीला कामावर ठेवणार नाही.
४) कोणताही अन्न (खाद्य) व्यवसायी कोणत्याही विक्रेत्याला कोणत्याही अन्न (खाद्य) पदार्थाची तोपर्यंत विक्रसाठी देणार नाही किंवा विक्रसाठी प्रस्तावित करणार नाही जोपर्यंत विनियमांद्वारे विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे अन्न (खाद्य) पदार्थाचे गुणर्धम व दर्जा याबाबत लेखी हमी देत नाही :
परंतु असे की, अन्न (खाद्य) व्यवसायीने विक्रेत्याला दिलेल्या कोणत्याही अन्न (खाद्य) पदार्थाच्या विक्रीया संदर्भात कोणतेही बिल, रोख मेमो किंवा बीजक दिले असेल तर ते बील,रोख मेमो किवा बीजकाद्वारे लेखी हमी विहित नमून्यात नसली तरीही ती हमी दिली गेली आहे असे मानले जाईल.
५) कोणतेही अन्न (खाद्य) असुरक्षित आहे जे उत्पादनाचा समूह (बॅच), वर्ग (लॉट) किंवा पाठविलेल्या मालाचा भाग आहे जो अन्नाच्या (खाद्याच्या) समवर्गीचा किंवा वर्णनाचा आहे, तेथे तो संबंध समूह वर्ग किवा पाठविलेला माल असुरक्षित आहे असे गृहित धरले जाईल, जोपर्यंत विनिर्दिष्ट वेळेच्या आत, उक्त समूह, वर्ग किंवा पाठविलेला मालाचा शेष भाग असुरक्षित आहे याचा पुरावा मिळत नाही किंवा अशी कोणतीही साक्ष नाही :
परंतु असे की, कोणत्याही अन्नाच्या (खाद्याच्या) विशेष वैज्ञानिक बाबी त्या अन्नास (खाद्यास) लागू असतील तर, एखाद्या सक्षम प्राधिकऱ्याच्या अन्न (खाद्य) बाजारात आणण्यावर निर्बंध टाळण्यासंबंधी पावले उचलण्याच्या किंवा माल बाजारातून परत मागविण्याच्या अधिकारासा बाध न आणता, लेखी कारणे नोंदवून, प्राधिकारी अन्नाच्या योग्यतेची शाबिती असली तरी, अन्नाच्या असुरक्षिततेबाबात शंका असेल तर तशी पावले उचलू शकेल.

Leave a Reply