अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६
कलम २३ :
अन्नास (खाद्यास) आवेष्टित करणे आणि लेबल लावणे (खूणचिठ्ठी लावणे) :
१) कोणतीही व्यक्ती विनियमाद्वारा विनिर्दिष्ट केल्या प्रकारे चिन्हांकित व लेबल लावलेली नसतील अशा कोणत्याही आवेष्टणीकृत अन्न (खाद्य) उत्पादनांचे उत्पादन, वितरण, विक्री करणार नाही किंवा विक्रीसाठी अभिदर्शित किंवा कोणत्याही अडत्या (अभिकर्ता) किंवा दलालास पाठवणी किंवा बटवडा करणार नाही :
परंतु असे की, लेबलावर असे कोणतेही निवेदन, दावा, अभिकल्प (डिजाइन) किंवा युक्ति अंतर्भूत असणार नाही जी वेष्टणात अंतर्भूत केल्यास कोणत्याही विशेष अन्न (खाद्य) उत्पादनाच्या संबंधी मिथ्या किंवा दिशाभूल करणारे ठरु शकेल किंवा गणने संबंधी किंवा अशा पोषक तत्वांसंबंधी चिकित्सक असतील किंवा रोग उपचारक विषयक दावे केलेले असतील किंवा अन्न (खाद्य) उत्पादनाच्या जागेच्या प्रारंभाबाबत असतील.
२) प्रत्येक अन्न (खाद्य) व्यवसायी अन्नाचे (खाद्याचे) लेबल आणि प्रस्तुतीकरण ज्यात त्यांच्या आकार, स्वरुप किंवा वेष्टणावळ, वापरलेली वेष्टणावळीची सामग्री, त्याची मांडणी आणि प्रदर्शित करण्याची जडण आणि या सर्वांची कोणत्याही माध्यमातून दिलेली माहिती, ग्राहकाची दिशाभूल करणारी असणार नाही, असे सुनिश्चित करील.