अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६
प्रकरण ४ :
अन्न (खाद्य) पदार्थांच्या बाबतीत सर्वसाधारण तरतुदी :
कलम १९ :
अन्न (खाद्य) समावेशी (फूड अॅडिटीव्ह) किंवा प्रकिया सहाय्यक यांचा वापर :
कोणत्याही अन्न (खाद्य) पदार्थात कोणताही अन्न (खाद्य) समावेशी किंवा प्रक्रिया सहाय्यक, या अधिनियमास आणि या अन्वये बनविलेल्या विनियमांच्या तरतुदींस अनुसरुन नसेल तो पर्यंत वापरला जाणार नाही.
स्पष्टीकरण :
या कलमाच्या प्रयोजनार्थ प्रक्रिया सहाय्यक म्हणजे असा कोणताही पदार्थ किंवा सामग्री ज्यात उपकरणे व भांड्यांचा समावेश होत नाही, व जे अन्न (खाद्य) घटक म्हणून थेट उपभोग केले जात नाहीत परंतु जे कच्च्या मालाच्या प्रक्रियेत वापरले जातात, अन्न (खाद्य) किंवा त्याचे घटकांत तांत्रिकी स्वरुपात उपचार किंवा प्रक्रिया पार पाडण्यासाठी केले जातात व ज्याची निष्पत्ती अहेतुकपणे व अटळ स्वरुपात अंतिम पदार्थात अवशेष व व्युत्पत्ती (डेरिव्हेटिव्हज्) रुपांत प्रदर्शित होते असे पदार्थ.