अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६
कलम १४ :
वैज्ञानिक समिती :
१) अन्न (खाद्य) प्राधिकरण, वैज्ञानिक समिती स्थापन करेल, जी वैज्ञानिक मंडळाचे अध्यक्ष आणि सहा स्वतंत्र विज्ञान-विशेषज्ञ जे कोणत्याही मंडळाशी संबंधित किंवा जोडले गेलेले नसतील, अशा व्यक्तींची मिळून बनलेली असेल.
२) वैज्ञानिक समिती अन्न (खाद्य) प्राधिकरणाला वैज्ञानिक मते देण्यासाठी जबाबदार असेल आणि जेथे आवश्यक असेल तेथे सार्वजनिक (लोक) सुनावणी आयोजित करण्याचा अधिकार असेल.
३) वैज्ञानिक समिती वैज्ञानिक मत प्रक्रियेची सुसंगतता सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक असलेल्या सामान्य समन्वयासाठी आणि विशेषतः, वैज्ञानिक मंडळाच्या कार्यपद्धतीचा अवलंब करण्याबाबत आणि कार्यपद्धतींच्या समन्वयासाठी जबाबदार असेल.
४) वैज्ञानिक समिती एकापेक्षा जास्त वैज्ञानिक मंडळाच्या कार्यक्षमतेत येणाऱ्या बहु-अनुशासनात्मक मुद्द्यांवर आणि कोणत्याही वैज्ञानिक मंडळाच्या पात्रतेमध्ये न येणाऱ्या मुद्द्यांवर मत देईल.
५) जिथे आवश्यक असल्यास, आणि विशेषत: कोणत्याही वैज्ञानिक मंडळाच्या कार्यक्षमतेत न येणाऱ्या विषयांच्या बाबतीत, वैज्ञानिक समिती कार्यरत गट स्थापन करेल आणि अशा प्रकरणांमध्ये वैज्ञानिक सल्ला स्थापित करताना त्या कार्यगटांचे तज्ञांचे मत जाणून घेईल.