Fssai कलम १० : मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची कार्ये :

अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६
कलम १० :
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची कार्ये :
१) मुख्य कार्यकारी अधिकारी, अन्न (खाद्य) प्राधिकरणाचा विधिक प्रतिनिधी असेल आणि तो निम्नलिखित बाबींकरिता उत्तरदायी असेल, अर्थात,-
(a) क) अन्न (खाद्य) प्राधिकरणाचे दैनंदिन प्रशासन;
(b) ख) केन्द्रीय सल्लागार समितिशी विचारविनिमय करुन अन्न (खाद्य) प्राधिकरणाच्या कार्य संबंधी कार्यक्रमाचा प्रस्ताव तयार करणे;
(c) ग) अन्न (खाद्य) प्रधिकरणाद्वारा अंगीकृत कार्यक्रम आणि निर्णय कार्यान्वित करणे;
(d) घ) वैज्ञानिक समिती वैज्ञानिक मंडळाकरिता योग्य वैज्ञानिक, तांत्रिक आणि प्रशासकीय समर्थनाचे उपबंध निश्चित करणे;
(e) ङ) अन्न (खाद्य) प्राधिकरण, आपल्या वापरकर्त्यांच्या अपेक्षांनुसार आपली कार्य विशिष्टत: सेवा उपलब्ध करुन देते त्यासाठी घेतलेला कलावधी पर्याप्त असतो त्याची निश्चिती करणे;
(f) च) महसूल आणि खर्चाचे विवरण तयार करणे आणि अन्न (खाद्य) प्राधिकरणाचे अर्थसंकल्पाची अंमलबजावणी करणे;
(g) छ) केन्द्र सरकारशी संपर्क विकसित करणे व जतन करणे आणि त्याच्या संबंधित समितीशी वेळोवेळी चर्चा निश्चित करणे.
२) मुख्य कार्यकारी अधिकारी प्रत्येक वर्षी अन्न (खाद्य) प्राधिकरणासमोर अनुमोदनाकरिता निम्नलिखित गोष्टी प्रस्तुत करेल, अर्थात :-
(a) क) अन्न (खाद्य) प्राधिकरणाच्या मागील वर्षाच्या सर्व कामकाजाचा आढावा घेणारा सर्वसाधारण अहवाल;
(b) ख) कार्यासंबंधी कार्यक्रम;
(c) ग) मागील वर्षाचे वार्षिक हिशेब; आणि
(d) घ) आगामी वर्षाकरिता अर्थसंकल्प.
३) मुख्य कार्यकारी अधिकारी, अन्न (खाद्य) प्राधिकरणाद्वारा सर्वसाधारण अहवाल व कार्यक्रमाच्या अनुमोदनानंतर ते केन्द्र सरकार व राज्य सरकारांना पाठवतिल व ते प्रकाशित करतील.
४) मुख्य कार्यकारी अधिकारी, अन्न (खाद्य) प्राधिकरणाच्या सर्व वित्तिय (आर्थिक) व्यय (खर्च) अनुमोदित करेल व केन्द्र सरकारला प्राधिकरणाच्या कामकाजाविषयी अहवाल सादर करील.
५) मुख्य कार्यकारी अधिकारी, अशा वस्तुंच्या अन्न सुरक्षेशी संबंधित असलेल्या विषयांवर कारवाई करताना अन्न (खाद्य) सुरक्षा आयुक्तांच्या शक्तीचा उपयोग करील.
६) मुख्य कार्यकारी अधिकारी, अन्न (खाद्य) प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांवर व कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय नियंत्रण ठेवील.

Leave a Reply