स्फोटक पदार्थ अधिनियम १९०८
कलम ३ :
जीवित किंवा मालमत्ता यांना धोका पोहोचवण्याचा संभव असलेल्या स्फोटासाठी शिक्षा :
जी कोणतीही व्यक्ती बेकायदेशीरपणे आणि दुर्भावाने –
(a)(क)(अ) स्फोटक पदार्थाने, जीवितास धोका निर्माण होऊ शकेल किंवा मालमत्तेला गंभीर हानी पोहोचू शकेल अशा प्रकारचा, स्फोट घडवून आणील त्यास, प्रत्यक्षात त्यामुळे व्यक्तीला किंवा मालमत्तेला कोणतीही इजा पोहोचली असली किंवा पोहोचली नसली तरी तिला जन्मठेपेची, किंवा दहा वर्षांपेक्षा कमी नसेल इतक्या कालावधीसाठी, कोणत्याही स्वरूपाच्या सश्रम कारावासाची शिक्षा होईल आणि ती द्रव्यदंडासही पात्र होईल;
(b)(ख)(ब) विशेष प्रवर्गातील स्फोटक पदार्थाने, जीवितास धोका निर्माण होऊ शकेल किंवा मालमत्तेस गंभीर हानी पोहोचू शकेल, अशा प्रकारचा स्फोट घडवून आणील त्यास, प्रत्यक्षात त्यामुळे व्यक्तीला किंवा मालमत्तेस कोणतीही इजा पोहोचली असेल किंवा पोहोचली नसेल तरी, मृत्युदंडाची, किंवा आजीव सश्रम कारावासाची शिक्षा होईल आणि ती द्रव्यदंडासही पात्र होईल.
——–
१. २००१ चा अधिनियम ५४ याच्या कलम २ अन्वये कलमे २ ते ५ ऐवजी समाविष्ट करण्यात आले.