पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६
कलम ५क :
१.(राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे अपील :
राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण अधिनियम २०१० (२०१० चा १९) याच्या प्रारंभानंतर किंवा त्यानंतर कलम ५ अंतर्गत कोणत्याही निदेशांमुळे व्यथित झालेली कोणतीही व्यक्ती, राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण अधिनियम २०१० च्या कलम ३ अंतर्गत स्थापन केलेल्या राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे, त्या अधिनियमाच्या तरतुदींच्या अनुसार, अपील दाखल करु शकेल.)
——–
१. २०१० चा अधिनियम क्रमांक १९ याच्या कलम ३६ व अनुसूची ३ द्वारा समाविष्ट करण्यात आले.
