Epa act 1986 कलम ९ : विवक्षित प्रकरणांना प्राधिकाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना अशी माहिती पुरविणे :

पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६
कलम ९ :
विवक्षित प्रकरणांना प्राधिकाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना अशी माहिती पुरविणे :
(१) एखाद्या अपघातामुळे किंवा इतर अनपेक्षित कृतीमुळे किंवा घटनेमुळे कोणत्याही पर्यावरण प्रदूषकाचे विहित मानकांपेक्षा अधिक प्रमाणात निस्सारण घडून आले असेल किंवा घडून येण्याची आशंका असेल तेव्हा, अशा निस्सारणास जबाबदार असणारी व्यक्ती आणि ज्या ठिकाणी असे निस्सारण घडून आले किंवा घडून येण्याची आशंका असेल त्या ठिकाणी ताब्यात असणारी व्यक्ती अशा निस्सारणाच्या परिणामी होणाऱ्या पर्यावरणी प्रदूषणास प्रतिबंध करण्यास किंवा ते सौम्य करण्यास बांधलेली राहील, आणि तो विहित करण्यात येतील अशा प्राधिकाऱ्यांना किंवा अभिकरणांना –
(क) अशी घटना घडल्याची किंवा घडण्याची आशंका असल्याची वस्तुस्थितीसुद्धा तात्काळ कळवील; आणि
(ख) तसे फर्माविण्यात आल्यास, सर्व प्रकारे साहाय्य करण्यास बांधलेली राहील.
(२) पोटकलम (१) मध्ये निर्देशिलेल्या स्वरूपाची कोणतीही घयना घडल्याची वस्तुस्थिती किंवा तशी आशंका असल्याची माहिती त्या पोटकलमाखालील सूचनेद्वारे किंवा अन्यथा मिळाल्यानंतर, पोटकलम (१) मध्ये निर्देशिलेले प्राधिकारी किंवा अभिकरणे, शक्य होईल तितक्या लवकर, पर्यावरणी प्रदूषणास प्रतिबंध करण्याची किंवा ते सौम्य करण्यासाठी आवश्यक असतील अशा सुधारात्मक उपाययोजना करण्यासाठी व्यवस्था करतील.
(३) पोटकलम (२) मध्ये निर्देशिलेल्या सुधारात्मक उपाययोजनांच्या संबंधात कोणत्याही प्राधिकाऱ्यास किंवा अभिकरणास काही खर्च करावा लागला असल्यास, तो खर्च, तसेच, खर्चाची मागणी करण्यात आल्यास त्या तारखेपासून तो खर्च चुकता केला जाण्याच्या तारखेपर्यंतचे व्याज (शासन आदेशाद्वारे निश्चित करील अशा, वाजवी दराने) जमीन महसुलाची किंवा शासकीय येणे रकमेची थकबाकी म्हणून, अशा प्राधिकाऱ्यास किंवा अभिकरणास संबंधित व्यक्तीकडून वसूल करता येईल.

Leave a Reply