पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६
कलम २४ :
अन्य कायद्यांचा प्रभाव :
(१) पोटकलम (२) च्या उपबंधाच्या अधीनतेने, या अधिनियमाचे उपबंध, त्याखाली केलेले नियम किंवा आदेश हे, या अधिनियमाखेरीज अन्य कोणत्याही अधिनियमान्वये त्यांच्याशी विसंगत असे काहीही असले तरी, अमलात आणले जातील.
(२) जेव्हा एखादी कृती किंवा अकृती यामुळे या अधिनियमाखालील तसेच कोणत्याही इतर अधिनियमाखालील शिक्षापात्र अपराध घडतो, तेव्हा, अशा अपराधाबद्दल दोषी असल्याचे आढळलेला अपराधी त्या इतर अधिनियमान्वये शिक्षा दिली जाण्यास पात्र होईल; या अधिनियमान्वये नव्हे.