पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६
(सन १९८६ चा २९) २३ मे, १९८६
प्रस्तावना :
प्रकरण १ :
प्रारंभिक
कलम १ :
संक्षिप्त नाव, विस्तार व प्रारंभ :
पर्यावरणाचे संरक्षण व सुधारणा आणि त्यांच्याशी निगडित अशा बाबींसाठी उपबंध करण्याकरिता अधिनियम.
ज्याअर्थी, जून १९७२ मध्ये स्टॉकहोम येथील संयुक्त राष्ट्रांच्या मानवी पर्यावरणासंबंधीच्या ज्या परिषदेमध्ये भारताने भाग घेतला होता त्या परिषदेत, मानवी पर्यावरणाचे संरक्षर व सुधारणा करण्यासाठी समुचित उपयोजना करण्यासंबंधी निर्णय घेण्यात आले होते;
आणि ज्याअर्थी, उपरोक्त निर्णय हे पर्यावरणाचे संरक्षण व सुधारणा आणि मनुष्यप्राणी, इतर जीवसृष्टी, वनस्पती व संपत्ती यांना पोचणाऱ्या जोखमीस प्रतिबंध करणे यांच्याशी संबंधित आहेत तेथवर ते आणखी कार्यान्वित करणे आवश्यक वाटत आहे;
त्याअर्थी, या द्वारे भारतीय गणराज्याच्या सदतिसाव्या वर्षी संसदेकडून पुढीलप्रमाणे अधिनियमित होवो :-
————
(१) या अधिनियमास, पर्यावरण (संरक्षण) अधिनियम, १९८६ असे म्हणावे.
(२) त्याचा विस्तार संपूर्ण भारतभर आहे.
(३) केंद्र सरकार राजपत्रातील अधिसूचनेद्वारे नियत करील अशा १.(दिनांकास) तो अमलात येईल आणि या अधिनियमाच्या वेगवेगळ्या उपबंधांकरिता आणि निरनिराळ्या क्षेत्रांकरिता वेगवेगळे दिनांक नियत करता येतील.
———
१. १९ नोव्हेंबर १९८६, अधिसूचना क्रमांक जी.एस.आर ११९८ (ई) दिनांक १२ नोव्हेंबर १९८६, भारताचे राजपत्र, असाधारण भाग २, खंड ३ (एक) पहा.